
जिल्हापरिषद सिंधुदुर्ग आणि माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत करतोय ध्यास,
त्यास दिली भागीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान संस्थेने साथ.
आता तुम्ही सर्वांनी द्या या उपक्रमास साथ,
सर्वांनी मिळून थांबवूया पर्यावरणाचा होणारा ऱ्हास…
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये गणेश चतुर्थी खूप लांब म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या 19 तारीख ला आली. सर्वच आतुरतेने वाट पाहत असणारा हा सण बघता बघता कधी जवळ आला समजलेच नाही. सर्व ठिकाणी लगबग सुरू झाल्याचे दिसून येते. गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक आणि आवडता सण आहे. नवीन कॅलेंडर घरात आले रे आले की गणेशोत्सव कधी आहे याचीच सर्वांना आतुरता असते. या उत्सवामध्ये गणपतीची सेवा, पुजा केली जाते. हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते, व पुढील दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मिय गणेशोत्सव हा जल्लोषात साजरा करतात परंतु सध्याच्या बदलत्या युगा नुसार सर्वच ठिकाणी, हा उत्सव कमी आणि दिखावूपणा जास्त होत आहे, आणि याच गोष्टीमुळे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. मीच का पर्यावरणाचा विचार करायचा? असे म्हणून सगळेजण हा विषय टाळत आहेत. पण जर प्रत्येकाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला तर थोड्या प्रमाणात का होईना आपण प्रदूषण टाळू शकतो.
आपल्या गणेशाची मूर्ति सुंदर आणि अप्रतिम दिसावी असा प्रत्तेकचा विचार असतो. त्या साठी हल्ली अनेक स्पर्धा देखील भरवल्या जातात. त्यामुळे सर्वजण पर्यावरणाचा विचार न करता आपली गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवून घेतात. प्लास्टर पॅरिस च्या गणेशमूर्ती नदीपात्रात किंवा समुद्रात विसर्जन केल्यावर विघटन होण्यासाठी कित्येक वर्ष लागतात. त्याच बरोबर सजावटीसाठी थर्माकोल चा वापर, घातक रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो यामुळे जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होताना आपल्याला पहायला मिळते. त्यामुळेच जिल्हापरिषद सिंधुदुर्ग आणि माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत हरित गणेशोत्सव उपक्रम राबविण्यात आला. ज्या मध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पाणी प्रदूषित करण्याऐवजी मातीच्या किंवा शाडूच्या मूर्तीचे पूजन करून कृत्रीम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज आहे.

सिंधुदुर्ग, कोकणामध्ये प्रत्तेक घरामध्ये गणपती बसविले जातात. या हजारोंच्या संख्येने गणेशमूर्ती चे विसर्जन केले जाते. या मुर्त्या पाण्यामघ्ये न विरघळल्यामुळे त्या पाण्यावर तश्याच तरंगत राहताना दिसतात. हे बघून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी हरित गणेशोत्सव उपक्रमाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीचा वापर करावा हे आवाहन आम्ही करत आहोत. इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी वापरणारे रंग हे कच्चे व प्राकृतिक असतात. यामुळे पाण्याला कुठलीही हानी पोहचत नाही. मातीच्या बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहचवत नाही आणि इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात. तुम्ही शाडूची मूर्ती घरीच विसर्जित करू शकता. त्यानंतर त्या विरघळलेल्या मातीचा तुम्ही उपयोग देखील करू शकता. या सर्व गोष्टी केल्यामुळे बाप्पाच्या मूर्ती ची विटंबना टळेल व पर्यावरण पण सुरक्षित राहील. आम्ही या उपक्रमाद्वारे सर्वांनाच आवाहन करत आहोत की या वर्षी सर्वांनीच इको फ्रेंडली मूर्ती बनवून घ्यावी.


जिल्हापरिषद सिंधुदुर्ग आणि माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत करतोय ध्यास,
त्यास दिली भागीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान संस्थेने साथ.
आता तुम्ही सर्वांनी द्या या उपक्रमास साथ,
सर्वांनी मिळून थांबवूया पर्यावरणाचा होणारा ऱ्हास…
सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

तालुका
35

मूर्तिकार
150

मूर्ति
5000

मूर्ति
5000